Sunday, 30 April 2017

कामगार दिन

आज १ मे कामगार दिन! व महाराष्ट्र दिनाच्या मंगलकामना!!.

*कामगारनेते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर*

बाबासाहेब नसते तर आणखी किती वर्षे गीतेत सांगितल्याप्रमाणे *"कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l"* अर्थात, कामगारानो दिवस रात्र फक्त घाम गाळा, मेहनत करा, सवर्णांची सेवा चाकरी करा, त्यांची धुनीधुआ, शेतात राबा, त्यांचा मैला साफ करा, जीव तोडून मजुरी करा मात्र मजुरी मांगू नका.

*कारण मैला साफ करणे हेच तुमचे कर्म, तम्ही नीच - कुल्षित आहात म्हणून फळाची अपेक्षा करू नका..*

माझ्या शेतकरी- मजूर - कष्टकरी यांनी वरील होणारा अन्याय का सहन करावा? म्हणून संधीच्या शोधत असताना, ब्रिटीश राजवटीत मजूर मंत्री पदावर काम करावयाची संधी मिळाली आणि मजुरांचे दिवस पालटले...  बुलंद आकाशात सुर्य... 
आणि धरणीवरचा महासूर्य *बाबासाहेब....* 
  
शेतकरी- मजूर - कष्टकरीयांच्या अंधार जीवनात कायमचा महाप्रकाश टाकून गेला..
  
*तुला कोणी दिल्या सुविधा- सवलती...*

होय!!! *महासूर्य बाबासाहेब आंबेडकरांनी...*

1. *आठ तास कामाची वेळ* (Reduction in Factory Working Hours 8 hours duty)

2. *महिलांना प्रसूती रजा* (Mines MaternityBenefit Act)

3. *महिला कामगार वेलफेयर फंड* (Women Laborwelfare fund)

4. *महिला व बालकामगार संरक्षण कायदा* (Womenand Child, Labor Protection Act)

5. *खाणकामगार यांना सुविधा* (Restoration of Ban on Employment of Women on Underground Work in Coal Mines)

6. *भारतीय फेक्टरी कायदा* (Indian Factory Act)

7. Maternity Benefit for women Labor, Restoration of Ban on Employment of Women on Underground Work in CoalMines,

8. National Employment Agency (Employment Exchange)

9. Employment Agency was created.

10. Employees State Insurance (ESI):

11. India’s Water Policy and ElectricPower Planning

12. Dearness Allowance (DA) to Workers.

13. Leave Benefit to Piece Workers.

14. Revision of Scale of Pay forEmployees.

15. Coal and Mica Mines Provident Fund

16. Labor Welfare Funds

17. Post War Economic Planning

18. Creator of Damodar valley project, Hirakund project, The Sone River valleyproject.

19. The Indian Trade Unions(Amendment) Bill

20. Indian Statistical Law

21. Health Insurance Scheme.

22. Provident Fund Act.

23. Factory Amendment Act.

24. Labor Disputes Act.

25. Minimum wage.

26. The Power of Legal Strike..

आज फेक्टरीतला कामगार, व कार्पोरेट मधील अधिकारी सर्वांनी बाबासाहेब आंबेडकर याचे जीवनसंघर्ष विसरता कामा नये..

*आज कामगार दिनी या महान क्रांतीसुर्याला पुन्हा एकदा मानाचा जयभीम करूया....*

जयभीम ! 
जय शिवराय !! 
जय भारत !!!

Saturday, 22 April 2017

Pink ribbon

_मी छानसं काही वाचलेल आणि आवडलेलं -जरुर वाचा..._
_तुम्हाला माझ्याकडून आलेली ही पिंक रिबन.... 🎀_

            *🎀 पिंक रिबन 🎀*

_न्यूयॉर्क शहरातल्या एका शिक्षिकेने वर्षाच्या शेवटी तिच्या वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या शर्टावर *पिंक रिबन*चा बो लावला. त्या रिबनवर लिहिले होते Who you are, makes a difference. तुझ्या असण्यामुळे (माझे ) आयुष्य बदलले आहे._

_प्रत्येक विद्यार्थ्याला संदेश वाचून खूप आनंद झाला._

_''वा, माझ्यामुळे टीचरच्या आयुष्यात फरक पडला आहे.'' पण नुसते एवढेच करून ती शिक्षिका थांबली नाही. तिने प्रत्येक विद्यार्थ्याला अजून तीन रिबन दिल्या व सांगितले, ''तुमच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना धन्यवाद द्या व त्यांच्या कपड्यावर ही पिंक रिबन लावा.''_

_एका विद्यार्थ्याने शेजारच्या घरात राहणार्‍या एका तरुणाच्या शर्टावर ''थँक यू, तुझ्यामुळे माझे आयुष्य बदलले आहे म्हणून मी तुला ही *पिंक रिबन* लावतो'' असे म्हणत रिबन लावली. तो शेजारी एका ऑफिसमध्ये ज्युनियर कर्मचारी होता. त्याने त्या विद्यार्थ्याला अभ्यासात मदत केल्यामुळे विद्यार्थ्याला परीक्षेत अव्वल नंबर मिळाला होता._

_विद्यार्थ्याने उरलेल्या दोन रिबन त्याला दाखवत विचारले, ''आम्ही शाळेसाठी एक प्रोजेक्ट करतो आहोत. तुझ्या आयुष्यात ज्या माणसामुळे चांगला बदल झाला आहे त्यांना ही रिबन लावशील का?''_

_कर्मचारी लगेच तयार झाला. दुसर्‍या दिवशी त्याने आपल्या बॉसपाशी जाऊन ''थँक यू You made a difference in my life " असे म्हणत पिंक रिबनचा बो लावला. बॉस अत्यंत हुशार होता, कंपनी त्याच्यामुळे चालली होती; पण तो खडूस म्हणूनही प्रसिद्ध होता. तरीही कर्मचार्‍याने बो लावल्यावर बॉसच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तो म्हणाला, ''माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात बदल झालाय? तुझ्यासाठी मी इतका महत्त्वाचा आहे हे मला माहीतच नव्हते. थॅक्यू.''_

_कर्मचार्‍याने त्याला विचारले, ''ही कल्पना माझी नाही. हे एका शाळेतले प्रोजेक्ट आहे. आयुष्यात बदल करणार्‍या लोकांना धन्यवाद देऊन त्यांना हा पिंक रिबनचा बो लावायचा. तुम्हाला आवडेल असे करायला?'' बॉस एकदम म्हणाला, ''हो नक्की आवडेल. आहे तुझ्याकडे अजून एखादा बो?'' कर्मचार्‍याने आपल्याकडचा उरलेला बो बॉसला दिला._

_बॉस घरी गेला. त्याने आपल्या मुलाला बोलावले . मुलाच्या शर्टावर पिंक रिबनचा बो लावत तो म्हणाला, ''मी कामामुळे उशिरा घरी येतो, घरी आल्यावर माझी चिडचिड होते, मी तुझ्याशी प्रेमाने बोलतही नाही, मी आजवर तुला कधी हे सांगितले नाही, पण तू जसा आहेस तसाच रहा. तुझे असणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. Who you are, makes a difference in my life "_
 
_मुलगा ढसाढसा रडायला लागला. तो म्हणाला, ''डॅड , मला वाटायचे की तुला मी अजिबात आवडत नाही. मी तुला कधीच खूश करू शकणार नाही म्हणून आज रात्री मी आत्महत्या करणार होतो._

_ही बघ, मी तुला व आईला चिठ्ठी लिहून ठेवली होती. पण ही रिबन लावलीस आणि माझं आयुष्य बदलवलेस डॅड._

_''बॉसने चिठ्ठी वाचली. त्याने आपल्या मुलाला घट्ट पोटाशी धरले. दोघेही एकमेकांच्या मिठीत आनंदाचे अश्रू ढाळत होते. त्या एका रिबनमुळे मुलाला बाबा व आयुष्य दोन्ही मिळाले होते आणि बापालाही मुलगा मिळाला होता._

_आई मुलांविषयीचे प्रेम सहज व्यक्त करू शकते._
_मुलेही आईशी मोकळेपणाने बोलू शकतात._
_आईला ते जन्मजात कसब असते. कारण स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंतकाळची माता असते._

_पण पुरुष हा क्षणाचा पिता असतो, पण म्हणून त्यांचे महत्त्व मुलाच्या आयुष्यात कमी नसते. उलट अनेक मुले वडिलांच्या नजरेतही आपण कोणीतरी असावे यासाठी आयुष्यभर झटतात,_

_पण काही वडिलांना त्याबद्दल काहीच वाटत नसते. मुलांकडे पूर्णत: दुर्लक्ष करत हे पुरुष कामात मग्न रहातात._

_म्हणतात की, Any man can be a Father but it takes someone special to be a Dad._

_कोणीही पुरुष बाप सहज बनू शकतो, पण बाबा होणे काहींनाच जमते._

_*चांगला पालक होणे ही प्रवृत्ती आहे. असिधारा व्रत आहे. त्यासाठी शिक्षण, जात, धर्म यांपैकी कशाचीही जरूर नसते. फक्त इच्छा असावी लागते...*_

_सदर पोस्ट आवडल्यास ही *पिंक रिबन* इतरांनाही पाठवा कदाचित त्यांच्यामुळे तुमचं आयुष्य बदलले असेल...._

_"जेवणात जर कोणी विष कालवले तर त्यावर उपचार आहे, परंतु मनामध्ये जर कोणी विष भरवले तर त्यावर कोणताच उपचार नाही ."_

🍂🍃🍃🍂
_*" पिंक रिबन "*_ 🎀

_अप्रतिम आयुष्य बिघडवायला वेळ लागत नाही पण घडवायला आत्मविश्वास लागतो मन मोठं असावं लागतं._

Tuesday, 11 April 2017

Tulna Karu naka

*गोष्ट एका बांबूची*
   🌹बोधकथा🌹  

एका माणसाने एक जंगली बांबूचा कोंब आणला आणि आपल्या बागेत लावला. त्याच्या बागेत त्याने हल्लीच अनेक वेगवेगळी बियाणी लावली होती. जसे आंबा, फणस,  आणि बरेच काही. तो रोज त्या बियांबरोबर या बांबूच्या कोम्बालाही पाणी घालत होता. दिवसमागून दिवस जात होते. पण या बांबूच्या कोम्बामध्ये काही फरक दिसत नव्हता. एव्हाना इतर काही बियांची तर रोपटीही दिसू लागली होती. पण त्याने त्या सर्वांबरोबर त्या बांबूच्या कोम्बालाही पाणी घालण्याचा रतीब चालू ठेवला. इकडे आंब्या फणसाची झाडे वाढून त्यांना मोहोरही आला. त्या झाडांना आता फळे लागण्याची वेळ आली होती. पण अजूनही त्या कोंबत काही फराक दिसत नव्हता. तो माणूस आता विचार करू लागला होता कि हा कोंब लावून त्याने काही चूक तर केली नव्हती ना? त्या ऐवजी एखादे दुसरे झाड लावले असते तर कदाचित खूप फायदा झाला असता. असे म्हणून त्या कोम्बाकडे गेला, पहातो तर काय, त्या कोंबला थोडी नवी पालवी फुटू लागलेली होती. तो माणूस आता पुन्हा त्या कोंबला पाणी घालू लागला.आणि पुढच्या काही दिवसात त्या कोंबला अनेक फुटवे फुटून तो आता विस्तारू लागला होता. पुढच्या एक वर्षात तर त्या कोंबणे अर्धी बाग व्यापून टाकली आणि सगळीकडे घनदाट बांबूचे वन दिसू लागले.

असेच असते. प्रत्येकाच्या वाढीचा आणि विस्ताराचा वेगवेगळा कालावधी असतो. जेंव्हा त्या आंब्या फणसाच्या झाडांनी आपला विस्तार वर वाढवायचा प्रयत्न जोर धरून केला तेंव्हा तो बांबूचा कोंब आपला विस्तार जमिनीच्या आत वाढवत होता. तो मिळणारे सर्व पोषक अन्न आपल्या अंतर्गत वाढीला देत होता. त्यामुळे त्याची जेंव्हा वाढ आणि विस्तारण्याची वेळ आली तेंव्हा त्याने बाकीच्या झाडांना मागे टाकले, व्यापून टाकले. तसेच आपणही, आपली वाढ आणि विस्तार करायचा असेल तर आपली मुळे मजबूत आणि विस्तारित करावीत. काळ कितीही निघून गेला, आणि कोणीही आपल्या मागून येवून कितीही पुढे गेले तरी आपल्या क्षमतांचा विकास आपण त्या बांबूच्या कोम्बाप्रमाणे करावा. जेंव्हा आपल्या क्षमता अजमावण्याची वेळ येते तेंव्हा इतर जन कदाचित मागे पडतील पण एक परिपूर्ण व मजबूत व्यक्ती कधीच मागे पडत नाही.
🌹तात्पर्य🌹
इतरांशी आपली तुलना करू नका. तुमच्या क्षमता अधिक मजबूत बनवण्यावर भर द्या. कारण प्रत्येकाकडे एकमेवाद्वितीय अशा कला व किमया असतात. कदाचित तुमच्या क्षमता इतरांच्याहून वेगळ्या आहेत. त्या ओळखा, पारखा, त्यांना योग्य वेळ आणि सराव द्या. तुम्ही यशवी होणार यात शंकाच नाही.
बौद्धीक आणि शारीरीक क्षमता वाढविणे म्हणजे हमखास यश मिळविणे होय.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼