Sunday, 7 May 2017

बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल थोर लोकांचे विचार

*डॉ. आंबेडकरांबद्दल प्रसिद्ध व्यक्तींची मते*

_आम्ही डॉ. आंबेडकरांच्या जीवन आणि कार्यापासून प्रेरणा घेऊन आमचा संघर्ष सुद्धा त्याच आधारांवर चालवणार ज्या आधारांवर डॉ. आंबेडकरांनी समाज परीवर्तनाचा प्रयत्न केला आणि यश मिळवलं._

*- नेल्सन मंडेला, भारतीय संसद, १९९०*

डॉ. आंबेडकरांचे संविधान आणि जातीनिर्मुलनवादी लेखन ही आमची ऊर्जा आहे

*- नेल्सन मंडेला*

डॉ. आंबेडकर अर्थशास्त्रामध्ये माझे ‘पिता’ आहेत.

*- डॉ. अमर्त्य सेन*

भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरीकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहे.

*-प्रो. एडवीन सेलिग्मन*

_तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महापुरूष भारताला लाभले, त्यामुळे आम्हाला भारताबद्दल विशेष आदर आहे. आम्हाला बाबासाहेबांसारखी व्यक्ती लाभली नाही ही खंत आहे. बाबासाहेबांबद्दल अधिकाधिक माहिती मिळाली तेव्हा आम्हाला धक्काच बसला! जो धर्म या देशातून हद्दपार झाला होता, तो त्यांनी पुनर्जीवीत केला. डॉ. आंबेडकरांवर आम्ही एक डॉक्युमेंट्रिय तयार केली आहे. त्यांचे विचार हे केवळ भारतासाठीच नव्हे तर समस्त जगाच्या कल्याणासाठी आहे. त्यामुळे आता बाबासाहेबांचे विचार मी थायलंडच्या घराघरांत पोहोचवणार._

*- डॉ. रूंगथिप चोटनापलाई (थाई पत्रकार व न्यूज अँकर)*

_बाबासाहेबांबद्दल काहिही बोलणं मला असं वाटतं, जसं सूर्याला प्रकाश दाखवणं. आपण आपल्या घरांमध्ये नियम आणि कायदे नाही बनू शकत, त्यांनी एवढ्या मोठ्या देशाचे संविधान लिहून टाकले. स्वातंत्र्य मिळवणे एक गोष्ट आहे परंतु स्वातंत्र्य सांभाळणे वा टिकवणे खूप अवघट आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच आपण सारे सुरक्षित आहोत_

*- जितेंद्र (अभिनेता)*

_बाबासाहेबांचे विचार केवळ भारतासाठी नाही तर संपूर्ण जगाकरीता प्रेरक आहेत. त्यांचे राजकिय धोरण, आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनावर आधारित होते. त्यामुळे त्यांचे तत्त्वज्ञान हे विज्ञानवादी आणि मानवतावादी होते आणि म्हणूनच त्यांनी बौद्ध धम्माचा स्विकार केला._

*- थनसक पुमपेच (थायलंडचे मेजर जनरल)*

_डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ दलितांचे नेते नव्हते, केवळे भारत देशाचे नेते नव्हते तर बाबासाहेब हे संपूर्ण जगाचे नेते होते._

*- अरविंद केजरीवाल*

_भारताने स्वातंत्र्यासाठी लढा दिला तर डॉ. आंबेडकरांनी सामाजिक न्यायासाठी लढा दिला. त्यांनी लिहिलेली राज्यघटना जगात आदर्श आहे. त्यांनी लिहिलेली पुस्तके जगभर वाचली जातात._

*- विजयादा राजपक्षे (श्रीलंकेचे मंत्री)*

_तुम्ही कोण आहात, कुठून आलात हे तितकं महत्त्वाचं नाही, प्रत्येक मनुष्य त्याची क्षमता वापरू शकतो, जसे डॉ. आंबेडकरांनी स्वत:च्या आयुष्याची उंची गाठली आणि भारत देशाचे संविधान लिहून सर्वसामान्यांना त्यांचा हक्क मिळवून दिला._

*- बराक ओबामा, भारतीय संसद, २०१०*

_डॉ. आंबेडकरांची राष्ट्राला खरी गरज आता आहे - तीही शीघ्रतेने._

*- अरुंधती रॉय*

_महिलांच्या अधिकारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तसेच गरोदर महिलांना हक्काची रजा मिळवून देणारे बाबासाहेब हे जगातील पहिलेच व्यक्ती आहेत. त्यानंतर अनेक देशांनी आपापल्या देशामध्ये गरोदर महिलांसाठी सुटी लागू केली._

*- जब्बार पटेल*

_राज्यघटनेला ५० वर्ष पूर्ण झाली होती; तेव्हा इंग्लंडमध्ये संविधानावर चर्चा ठेवण्यात आली होती. त्यात जगभरातील संविधानाचे तज्ज्ञ अभ्यासक उपस्थित होते. अध्यक्षस्थानी इंग्लडचे सर्वोच्च न्यायाधिश होते. चर्चेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली राज्यघटना ही सर्वश्रेष्ठ असून त्यात एक अक्षर सुद्धा बदलण्याची गरज नाही, असे मत व्यक्त करण्यात आले होते. यावरून भारतीय राज्यघटनेची सर्वश्रेष्ठता सिद्ध होते_

*- जब्बार पटेल*

_डॉ. आंबेडकर हा युवक भारतीय इतिहासाची नवीन पाने लिहीत आहे._

*- एक युरोपीयन प्रवासी, ७ नोव्हेंबर १९३१*

_डॉ. आंबेडकर बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा मूळ झरा आहे._

*- गव्हर्नर रिचर्ड कॅसे*

बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ‘या युगातील भगवान बुद्ध’ आहेत.

*- महास्थविर चंद्रमणी*

_डॉ. आंबेडकर म्हणजे शतकाशतकातून कधीतरी काळाला पडणारे मानवतेचे भव्य दिव्य स्वप्न होते. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते असे म्हणतात. मी डॉ. आंबेडकरांची झाले आणि माझ्या जीवनाचं सोनं झालं. डॉ. आंबेडकरांसारख्या महामानवाच्या जीवनातील उत्तरार्धात अखेपर्यंत मी त्यांना सावलीसारखी साथ दिली. काया वाचा मने करून त्यांची सेवा केली, पूजा केली. जगाला भूषण वाटावे अशा युगप्रवर्तक महापुरूषाच्या जीवनाशी माझे जीवन निगडित झाले. यापेक्षा अधिक जीवनसाफल्य ते कोणते ?_

*- माईसाहेब डॉ. सविता आंबेडकर*

_डॉ. आंबेडकर हे एकटेच ५०० ग्रज्युएटांच्या बरोबरीचे आहे. स्वत:च्या मेहनतीने प्राप्त केलेली त्यांची विद्वत्ता एवढी आहे की ते ह्या विद्वत्तेच्या बळावर शासनाच्या कुठल्याही पदावर बसू शकतात._

*- जनरल गव्हर्नर लॉर्ड लिनलिथगो*

_डॉ. आंबेडकर हे सामाजिक क्रांतीचे प्रकाश आहेत._

*- राममनोहर लोहिया*

_डॉ. आंबेडकरांमध्ये तुम्हाला (अस्पृश्यांना) तुमचा उद्धारकर्ता लाभला आहे. हे तुमच्या बेड्या तोडून टाकतील याची मला खात्री आहे._

*-छ. शाहू महाराज, माणगांव परिषदेत, मार्च १९२०*

_डॉ. आंबेडकर हे दलितांचे मुक्तिदाता आहेत._

*- सयाजीराव गायकवाड*

_डॉ. आंबेडकरांच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द म्हणजे पिस्तुलातून उडणारे बार आहेत._

*- डॉ. बेव्हरले निकोल्स*

_जगात सहा विद्वान आहेत, त्यापैकी डॉ. आंबेडकर एक आहेत._

*- एक युरोपीयन*

_डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेबद्दल तर त्यांच्या शत्रूला देखिल कधी संशय वाटला नाही. त्यांच्याएवढा प्रचंड बुद्धिचा, विद्वत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रात नव्हे भारतात या क्षणी नव्हता. रानडे, भांडारकर, तेलंग आणि टिळक ह्यांच्या ज्ञानोपासनेची महान परंपरा पुढे चालविणारा महर्षी आज आंबेडकरांवाचून भारतात दुसरा कोण होता? वाचन, चिंतन आणि लेखन ह्यावाचून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हते. महार जातीत जन्माला आलेला हा माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एखाद्या प्राचीण ऋषीपेक्षांहीलश्रेष्ठ पदाला जाऊन पोहोचला होता. धर्मशास्त्रापासून ते घटनाशास्त्रापर्यंत असा कोणताही एक कठीण विषय नव्हता, की ज्यामध्ये त्यांची बुद्धी एखाद्या गरूडासारखी वाटेल त्या उंचीपर्यंत विहार करू शकत नव्हती._

*- प्रल्हाद केशव अत्रे*

_पाच हजार वर्ष हिंदूसमाजाने सात कोटी अस्पृश्यांचा अमानुष छळ केला, त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. डॉ. आंबेडकर म्हणजे बंड, मूर्तिमंड बंड. त्यांच्या देहातील कणाकणांतून बंड थैमान घालित होते. आंबेडकर म्हणजे जुलूमाविरूद्ध उगारलेली वज्रमूठ होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तडांच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनख होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरूद्ध सदैव पुकारलेले एक युद्धच होय._

*- प्रल्हाद केशव अत्रे*

_मी जेव्हा डॉ. आंबेडकरांना भेटण्यासाठी त्यांच्या राजगृहात गेलो, तेव्हा मी एका भल्या मोठ्या ग्रंथालयात आलो की काय! असा भाव तेव्हा मला झाला. त्यांच्यासारख्या विद्यासंपन्न पुरूष जगात दुसरा असू शकत नाही._

*- प्र. के. अत्रे*

_डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचल्यानंतर अस्तित्वाची व्यापक जाणीव झाली, डॉ. आंबेडकरांच्या साहित्याने आपण दलित आहोत आणि त्यातच वडार आहोत, याची जाणीव करून दिली. आंबेडकरांबद्दल खूपच आदर निर्माण झाला, मग मी आमच्या घरात डॉ. आंबेडकरांचा एक छान फोटो लावला, तो माझ्या वडीलांना अजिबात आवडला नाही. ते म्हणाले, ‘‘हा महाराचा फोटो घरात का लावलास ? लोक काय म्हणतील ? काढून टाक ताबडतोब हा फोटो.’’ मी त्यांना सांगितलं, ‘‘मी तर हा फोटो काढणार नाहीच, परंतु जर तुम्ही काढलात, तर तुमचे सारे देव मी बाहेर फेकून देईन, ह्या देवांनी तुम्हांला जे दिलं नाही आणि देवू शकत नाहीत, अशा गोष्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला दिल्या आहेत._

*' - नागराज मंजुळे*

_डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ठायी असलेले गुण इतके मोठे आहेत की, भारताचे मध्यवर्ती सरकार ते एकटे चालवू शकतील._

*- सदाशिव कानोजी पाटील*

_डॉ. आंबेडकर एक असे विद्वान आणि अद्वितीय वकिल आहेत की, त्यांच्या समोर अनेकांना हार पत्करावी लागते. ते आपल्या प्रगाढ विद्वत्तेने अनेकांच्या ह्रदयाला स्पर्श करण्याचं सामर्थ्य ठेवतात. त्यांच्या त्यागाची परिसीमा प्रचंड व्यापक आहे. ते एक नितळ जीवन जगतात. त्यांनी मनात आणलं तर ते केव्हाही युरोपात जाऊन राहू शकतात. परंतु ते ह्याची इच्छा ठेवत नाही. आपल्या दलित बांधवांचा उद्धार करणेच त्यांच्या जीवनाचे प्रमुख ध्येय आहे. त्यांना सतत शोषित वा अस्पृश्य वर्गाचे व्यक्ती असल्याच्या नात्यानेच संबोधित केले जात आहे. परंतु बुद्धिमत्तेच्या कसौटीवर ते हजारों सुशिक्षीत हिंदू विद्वानांपेक्षाही श्रेष्ठ दर्जाचे विद्वान आहेत. त्यांचे वयक्तिक जीवन आमच्यापैकी कोणत्याही उच्च दर्जाच्या निर्मळ आणि स्वच्छ व्यक्तीहून कमी नाही. आजच्या घटनेत ते कायद्याचे प्रख्यात अभ्यासक आहेत, उद्या ते कोणत्याही उच्च न्यायालयाचे न्यायाधिश ही बनू शकतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, या देशाच्या शासन-प्रशासनात असे कोणतेच पद नाही, ज्याच्यावर ते विराजमान नाही होऊ शकत._

*- महात्मा गांधी*

_डॉ. आंबेडकर हे लाखो सवर्ण हिंदूपेक्षा श्रेष्ठ असूनही त्यांना अस्पृश्य मानने ही आपल्या हिंदू धर्मशास्त्राची व आपली चूक आहे. ती सुधारणे इष्ठ आहे._

*- महात्मा गांधी*

_जग बदल घालुनि घाव,_
_सांगून गेले मला भीमराव।_

*- अण्णाभाऊ साठे*

_डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा एक असा मजबूत खांब भारत भूमीमध्ये रोवला आहे की, ज्याला इतर कोणीही हालवू सुद्धा शकत नाही._

*- महापंडित राहुल सांस्कृत्यायन*

_हिंदू समाजातील छळ अत्याचार करणाऱ्या सर्व प्रवृत्तीविरूद्ध बंड करणारी व्यक्ती म्हणजेच डॉ. आंबेडकर होय. त्या अत्याचारी प्रवृत्तीविरूद्ध जो आवाज त्यांनी उठवला त्याने लोकांच्या मन - मेंदूंना स्तुप्त अवस्थेतून जागृत केले आहे. त्यांनी देशाच्या शासन प्रशासनातील प्रत्येक मुद्यांवर विरोध दर्शवला आहे या मुद्द्यांवर प्रत्येक व्यक्तीने विरोध दर्शवला पाहिजे. डॉ. आंबेडकर यामुळे भारताच्या अती विशिष्ट लोकांमध्येही एक असामान्य आणि सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्त्व आहे._

*- जवाहरलाल नेहरू*

_भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते होते, दलितांचे कैवारी होते, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार होते एवढीच त्यांची मर्यादित ओळख नाही. ते विधीतज्ज्ञ होते. तर त्याहीपेक्षा ते सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ होते. भारतातले अर्थतज्ज्ञ कोण? या प्रश्‍नाला अमर्त्य सेन असे उत्तर नसून, सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकरच होते._

*- डॉ. नरेंद्र जाधव*

_जर डॉ. आंबेडकरांचा जन्म भारताव्यतिरिक्त अन्य कुठल्याही देशात झाला असता तर त्यांना सर्वमान्य विश्वमानवांमध्ये स्थान मिळालं असतं._

*- राणी एलिझाबेथ (द्वितीय)*

_मला या गोष्टीचा अधिकच आनंद होता की डॉ. आंबेडकरांना भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष बनवले गेले. त्यांनी ज्या निपूणता आणि कौशल्यासोबत स्वतंत्र्य भारताचे नवीन संविधान बनवले त्याला मी खूप उत्सुकतेने पाहत होतो. ती त्यांची एक अत्यंत उदांत भेट होती. बाबासाहेब गांधीच्या विरूद्ध अत्यंत कठोरपणे उभे राहिले होते ज्यात भारतीय अस्पृश्यांना पूणे-कराराद्वारा कॉग्रंसच्या सोबत बांधले गेले होते. डॉ. आंबेडकर यांच्यात एक प्रचंड ताकद होती आणि त्या विरूद्ध जाणे भारतीय वातावरणात कोणाच्याही आवाक्यातील गोष्ट नव्हती. अशा दूरदर्शी शूरवीर महापुरूषासोबत परिचीत होणे जीवनाला नव्या उत्साहाने भरून टाकणारी घटना होती. एक असे व्यक्ती ज्यांनी भारतीय इतिहासावर आपली न मिटणारी छाप सोडून ठेवली आहे._

*- लॉर्ड माउंटबॅटन*

_मी पहिल्या वेळी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांना इ.स. १९३१ च्या भारतीय गोलमेज परिषदेमध्ये भेटलो. दुसऱ्या वेळी मी इ.स. १९४६ मध्ये प्रधानमंत्री वलेमंट ऍटली च्या निमंत्रणावर भारताला अधिक अधिकार देण्याच्या विषयांवर चर्चा साठी गांधी, नेहरू, जिनाह, राजगोपालचारी आणि डॉ. आंबेडकर या नेत्यांना भेटलो. प्रतिनीधी मंडळाचा संदस्य असल्यामुळे आणि ब्रिटनच्या मजूर संघटनेशी संबधीत असल्याच्या कारणाने मला स्वभावत: डॉ. आंबेडकरांची मदत घ्यावी लागली. त्यांनी उद्योग, कारखाने आणि मजूरांच्या संबंधात खूप सारे महत्त्वपूर्ण सुझाव दिले होते. डॉ. आंबेडकर एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते आणि त्यांनी भारतीय समाजाच्या सुधारांसाठी खूप मोठे योगदान दिले आहे._

*- लॉर्ड बॉट्मली*

_तथागत बुद्धांनी जीवनाच्या अंतिम सत्याला जाणण्यासाठी अथक प्रयत्नांनी ‘बुद्धत्व’ प्राप्त केले, त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपली प्रचंड विद्वता आणि बुद्धिमत्तेने ‘बोधीसत्व' या अवस्थेला प्राप्त केले आहे._

*- महास्थवीर चंद्रमणी*

_डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे २०व्या शतकात बौद्ध धर्म भारताच्या इतिहासात एक आठवण मात्र नाही राहिला तर तो आता एक शक्तीशाली धार्मिक शक्ती बनून समोर आला आहे. डॉ. आंबेडकरांनी केवळ भारताच्या धार्मिक जीवनात असा चमात्कारीक प्रभाव टाकला आहे की, ज्याची इतिहासात कोणीही बरोबरी करू शकत नाही. कारण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या सोबत लाखो - लाखो लोकांनी मिळून बौद्ध धर्माची दीक्षा ग्रहण केली आहे._

*- महापंडित डॉ. आनंद कौसल्यायन*

_जय भीम, ..... मला बाबासाहेब नेहमी एक असे महापुरूष दिसून आले की, त्यांना केवळ दलितांचे नेते मी कधीही मानले नाही तर मी त्यांना आपले स्वत:चे नेते मानले. ते केवळ आपल्या देशाचेच नेते नव्हे तर संपुर्ण जगाचे नेते आहेत. कारण ते आपल्याला ‘मानवता’ शिकवतात, जी सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यांची जी शिकवण आहे ‘समानतेची’ महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक मनुष्य जो दलित नसेल ही, शोषित असेल, मागास (Underprivileged) असेल, पिडित असेल, अडचणीत असेल त्या सर्वांसाठी ते खूप मोठी प्रेरणा होते, आशेचे किरण होते आणि त्या त्या सर्वांना त्यांनी मार्ग दाखवला. प्रत्येक मनुष्य जे मानवतामध्ये विश्वास ठेवतात, मानवतेला आपला धर्म मानतात ते सारे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत. मला स्वत: त्याच्यांपासून खूप प्रेरणा मिळाली आहे. बाबासाहेबांच्या दोन गोष्टी मला खूप खास वाटतात. एक हे की, जेव्हा मी कधी अडचणीत असतो, कधी मी कोणत्या गोष्टीसाठी आवाज उठवतो जी मला योग्य वाटते आणि अशा अनेक ठिकाणी जिथे मला हिम्मत दाखवण्याची गरज पडते, जिथे मला त्या परिस्थीत भिती वाटते, मी हिम्मत हरू लागतो, तेव्हा मी बाबासाहेबांबद्दल विचार करतो. कारण ते एक असे महान व्यक्ती होते की ज्यांनी कधीही हिम्मत हरली नाही जरी त्यांच्यासंमोर कितीही मोठी समस्या असो, कितीही मोठे आव्हान असो त्यांची आपला संघर्ष नेहमी चालू ठेवला. ते निर्भय (Fearless) होते आणि ही त्यांची खास गुणवत्ता (कॉलिटी) आहे ज्यापासून मला खूप प्रेरणा मिळाली आहे. दुसरी त्यांची जी खास कॉलिटी आहे ते आहे त्यांच्या ह्रदयात असलेलं प्रेम! स्वत:साठी आणि आपल्या परिवारासाठी आपण सर्व विचार करतो, परंतु खूपच दुर्मिळ (rare) ते मनुष्य असतात जे सर्व लोकांसाठी विचार करतात. किसी प्रेम असेल बाबासाहेबांच्या की जे समग्र मानवतेसाठी विचार करू शकतात? या दोन गोष्टीपासून मी मला नेहमी त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली आहे. मी नेहमी प्रयत्न केला आहे, जे संविधान त्यांनी लिहिलयं त्यावर मी चालू आणि त्यांच्या मनात जे स्वप्न होतं समाजासाठी, त्याला जर आपल्याला पुर्ण करायचं असेल तर आपल्याला त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालावं लागेल. ज्या गोष्टी त्यांनी शिकवल्या त्या आपल्याला आपल्या जीवनाचा हिस्सा बनवावं लागेल. निसंदेय ते एक महापुरूष आहेत. आणि मी आपल्या देशाच्या युवकांना विनंती करतो की, जे ग्रंथ-पुस्तके बाबासाहेबांनी लिहिली ते आपण वाचावे, त्यापासून शिकवण घ्यावी आणि त्यांनी दाखवलेल्या वाटेवर आपण चालावे. आइ सल्युट बाबासाहेब. जय भीम."_

*- आमिर खान*

No comments:

Post a Comment