*लुगड्याची गोष्ट .*महात्मा ज्योतिबा फुले व साविञीबाई फुले
रात्रीची वेळ.. निरव शांतता .. तेलाच्या दिव्याचा मिण मिणता प्रकाश.
सावित्रीबाई पांघरूण अंगावर घेऊन झोपण्याच्या तयारीत..
ज्योतीराव कौतुकाने आपल्या बायकोच्या कपाळा वर हात ठेवतात.
",सावित्री. !" ज्योतीराव उद्गारले, "अगं, तुझं अंग गरम आहे. ताप येतोय का तुला ? "
"आहो, एवढं काही नाही .थोडी कण-कण आहे, झालं." ,सावित्रीबाई.
"अग पण ही कण-कण वाढली तर आपल्या शाळेचं कसं होईल? ,
मुलींच्या शिक्षणाच काय होईल?........
ते काही नाही,उद्याच वैद्यांना बोलावतो,
तू औषध घे म्हणजे लवकर बरी होशील."',--ज्योतीराव.
"आहो, हा ताप औषधाने नाही जायचा." सावित्रीबाई.
"मग?" ज्योतीरावांचा आश्चर्यचकित प्रश्न.
" तुम्ही मला शाळेत जाण्यासाठी अजून एक लुगडं देऊ शकलात तर हा ताप आपोआप जाईल." सावित्रीबाई.....
ज्योतीराव काहीशा नाराजीने दुस-या कुशीवर वळून झोपण्याचा प्रयत्न करू लागले.
त्यांचे विचारचक्र सुरु झाले.
लुगड्यासाठी ताप घेणारी सावित्री नक्कीच नाही...........
मग सावित्री असे का बरं बोलली?..........
तिच्याकडे एक लुगडं असताना ती दुसरं लुगडं का मागते?...........
आपल्याकडे जे पैसे आहेत ते शिक्षण कार्या करता आहेत ....
बायकोच्या लुगड्या करिता नव्हे ............
पण सावित्री शाळेत जाण्याकरिता लुगडं मागतेय म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार...........
विचार करीत-करीत ज्योतीराव झोपून गेले.
दुस-याच दिवशी ज्योतीरावांनी सावित्रीबाई्च्या हातावर नवे लुगडे ठेवले.
बाईंच्या डोळ्यात पाणी आलं...........
लुगड्यासाठी खर्च करायला ज्योतीरावांना खूप त्रास झाला असणार,
कारण त्यांच्या जवळ जे पैसे आहेत ते शिक्षण कार्याकरिता......
सावित्रीबाई पक्के जाणून होत्या.
त्या नंतर बाईंना कधी ताप नाही आला.
ज्योतीरावांना आश्चर्य वाटले, "हे कसं काय.".........
लुगड्या साठी ताप घेणारी सावित्री नाहीच............
ज्योतीरावांनी सावित्रीबाईंचे शाळेतील सहाय्यक होते, त्यांची भेट घेतली. आणि त्यांना सविस्तर प्रसंग सांगितला.
त्यांनी उलगडा केला,"सावित्रीबाई शाळेत येतांना लोक अंगावर शेण चिखलाचा मारा करतात.
बाई शाळेत आल्यावर अंगावरील लुगड्यावरचे शेण चिखलाचे डाग धुऊन ओल्या लुगड्याने दिवसभर शाळेत शिकवितात.
त्या मुळे रात्री त्यांना ताप येत असेल.
परंतु आता तुम्ही त्यांना दुसरं लुगडं दिल्या पासून शाळेत आल्यावर लुगडं बदलून माखलेलं लुगडं धुऊन ठेऊन कोरड्या लुगड्याने शाळेत शिकवितात .
त्या मुळे आत्ता त्यांना ताप येत नसेल."
आत्ता ज्योतीरावांच्या डोळ्यात पाणी आलं..
सावित्रीबाईंच्या महानतेस ज्योतीरावांनी मनोमन प्रणाम केला...!!
*आपणही त्या दोन्ही महान विभूतींस प्रणाम करू या...*
*कारण त्यांच्यामुळेच् आजच्या स्त्रीयां ज्या कुठल्यही जातीच्या असो की धर्माच्या शिकु शकल्या ..!!*
कर्मयोग जगताना किती खोलवर विचार करावा लागतो.
हृदयस्पर्शी अर्थपुर्ण अशी वाचनीय व समाजाभिमुख पोस्ट
*खरी शिक्षीका पुज्य सावित्रीबाईस कोटी कोटी प्रणाम*
🙏🙏🙏🙏🙏🙏
Golden Axe (twin black) - Titanium White Fennec
ReplyDeleteTitanium White Fennec is the most amazing product titanium water bottle of my vintage vintage vintage gaming machine. Thanks to the huge titanium post earrings popularity of Fennec, it titanium max trimmer was my titanium eyeglass frames first titanium white and