⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔
_*1 january 1818*_
⚔भिमाकोरेगांव महासंग्राम⚔
. ,/\,
/ \
|[[ |
|[[ | ए
|[[ | क
|[[ |
|[[ | ख
|[[ | रा
\°°°°°°°°°°°°°/
| [°°°°°°] | इ
| ````` | ति
/""""""""""""""'\ हा
| विजय स्तम्भ | स llllllllllllllllllllllllllllllll
लेख मोठा आहे पण नक्कि वाचा
१ जानेवारी १८१८ चा दिवस.
जगाच्या इतिहासातील एका अतुल्य पराक्रम आणि शौर्याचा दिवस.
याच दिवशी जुलमी व अन्यायी पेशवाईचा अंत झाला होता.
हि लढाई पुण्याजवळील भिमाकोरेगांव येथे ब्रिटीश आणि दुसरा बाजीराव पेशवा यांच्यात झाली होती.या लढाईत ब्रिटीशांच्या बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फ़्रटीच्या सेकंड महार बटालियनच्या केवळ५०० महार सैनिकांनी पेशव्यांच्या ~२८०००~ सैन्याचा पराभव केला. आणि देशातील जुलमी मनुवादी व्यवस्थेचा अंत केला. महार सैनिक पेशव्यांच्या विरुद्ध लढण्याची काही कारणे होती. मनुस्मृतीनुसार महार व इतर अस्पृश्य समाजाला गुलाम बनवले गेले होते. त्यांच्यावर अन्यान्वित अत्याचार केले गेले. त्यांना जनावरांपेक्षाही हीन वागणूक दिली जात होती. मनुस्मृतीच्या कायद्यानुसार त्यांना कठोर व अमानवीय शिक्षा दिल्या जात होत्या. लहान मुले,स्त्रिया यांचे देखील शोषण केले जात होते. हा अत्याचार हजारो वर्षांपासून अस्पृश्य समाज भोगत आला होता. छत्रपती शिवरायांच्या काळात मात्र अस्पृश्यांना या अत्याचारातून मुक्ती मिळाली होती. शिवाजी महाराजांमुळे अस्पृश्यांचे गुलामीचे जीवन नष्ट होऊन त्यांना मानाचे स्थान मिळाले होते. भीमा कोरेगावच्या लढाईपूर्वी महार सैनिक हे पेशव्यांचे राज्य टिकवून ठेवण्यासाठी मुघल व ब्रिटीश सैन्याविरुध्द इमानदारीने व प्राणपणाने लढले होते. त्यांनी पेशव्यांना अनेक विजय मिळवून दिले. परंतु या महार सैनिकांना सत्ताधिका-यांच्या (ब्राम्हण सैनिक) अवहेलना व अपमानाशिवाय काही मिळत नव्हते. खर्ड्याच्या लढाईत शिदनाक महाराने पराक्रम करून माधवराव पेशव्यास विजय मिळवून दिला होता. परंतु लढाईच्या मैदानातच शिदनाकसह महार सैनिकांचा ब्राम्हणाकडून अपमान करण्यात आला होता.पेशव्यांनी अस्पृश्य जातीतील मांग व चांभार यांना आपले लक्ष केले नव्हते. केवळ महारांना ते पाण्यात पहात असत. एकंदरीत महारांची पेशव्यांना भीती वाटत होती. रणांगनावर महार लोक करीत असलेले पराक्रम व त्यांना मिळत असलेले नेत्रदीपक यश बघून पेशवे राज्यकर्त्यांच्या मनात धडकी व दशहत बसली होती. महारांच्या या वाढत्या पराक्रमाला योग्यवेळी पायबंद घातला नाही तर महार हे शत्रूस मिळून पेशवेशाही बुडवतील किंवा स्वत:च राज्यकर्ते बनतील अशी शंका व धास्ती नेहमी पेशव्यांच्या मनात असे. महार लोक हे जरब महात्वाकांक्षी दिसतात हे पेशव्यांना कळून चुकले होते. त्यामुळेच सत्ता व धर्माच्या माध्यमातून महारांना बंधनात अडकविण्याचे षडयंत्र रचण्यात आले.अस्पृश्य समाजातील
विशेषत: महारांचे सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क हिरावून घेण्यासाठी मांग,चांभार व महार यांची अतीशुद्र व अस्पृश्य म्हणून गणना करण्यात आली व त्यांना गावकुसाबाहेरच्या वस्तीत राहण्यास बाध्य करण्यात आले. या अतिशुद्रांनी आचरण कशा पध्दतीने करावेत व त्यांची कर्तव्ये काय असावीत याची संहिता तयार करण्यात आली.मनुस्मृतीमध्ये या संहितेला कायद्याचे स्वरूप देण्यात आले. मनुस्मृतीच्या कायद्याचे पालन न करणाऱ्यास कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली.पेशवे स्वत:च कोकणस्थ ब्राम्हण असल्यामुळे मनुस्मृती तंतोतंत लागू करण्याचा आपला जन्मसिध्द हक्कच आहे या अविर्भावात वागत असत.अस्पृश्यांना बाजारात फिरण्याची मोकळीक नव्हती. अस्पृश्यांना ठरवून दिलेल्या वेळेशिवाय सार्वजनिक रस्ते सुध्दा वापरता येत नव्हते. अस्पृश्य वर्गाला स्पर्श करणे हे पाप असून त्यांची सावली सुद्धा अंगावर पडू दिली जात नसे. त्याकरिता अस्पृश्यांना गावात सकाळी नऊ वाजन्याच्या अगोदर व दुपारी तीन नंतर फिरण्याची सक्त मनाई असे कारण त्या कालावधीत सूर्य प्रकाशामुळे माणसांची सावली लांब पडत असते व अस्पृश्य माणसाची सावली इतर स्पृश्य लोकांवर पडू नये म्हणून हा नियम बनवण्यात आला होता. अस्पृश्यांना देवळात,पाणवठे व शिक्षणास मज्जाव करण्यात आला. पेशवाईच्या काळात अस्पृश्य समाजाच्या गळ्यात थुंकण्यासाठी मडके व पायाखालील रस्ता साफ करण्यासाठी कमरेला झाडू लावण्याची सक्ती करण्यात आली होती. कारण त्यांच्या थुंकीवर पायपडला तर विटाळ मानला जाई. तसेच पायाचे ठसे जमिनीवर उमटल्यानंतर त्या ठश्यांवर कोणत्याही स्पृश्य माणसाचा पाय पडू नये म्हणून ते ठशे झाडून जाण्यासाठी कंबरेला झाडू बांधला जाई.अस्पृश्यांनी तीर्थास जाऊन मंदिर प्रवेश केल्यास त्याचे परिपत्य करावे असे पेशवा सरकारचे सक्त आदेश होते. ब्राम्हण रस्त्यात भेटला तर अस्पृश्यांनी लगलेच खाली बसावे व पालथे पडावे असा दंडक होता. दुस-या बाजीरावाच्या काळात एखादा महार वा मांग तालीमाखान्यापुढून गेल्यास गुलटेकडीच्या मैदानात त्याच्या शिराचा चेंडू व तलवारीचा दांडू करून खेळल्या जात असे असा महाभयानक अत्याचार अस्पृशावर होत असे. त्यांना शहरात वास्तव्य करण्याची मुभा नव्हती. अस्पृश्यांना वेशीबाहेर दूर अंतरावर गलिच्छ व दरिद्री राहून झोपड्या बांधून राहण्यास भाग पाडल्या जात होते. खेड्यातील विहिरीजवळून महार जात असताना त्याला गुडघ्यावर रांगत जावे लागत असे, कारण त्याची सावली पाण्यावर पडली म्हणजे विटाळ मानला जात असे.ब्राम्हणाने अस्पृश्य स्त्रिशी व्यभिचार केला तर तो त्यांना चालत असे. तेव्हा विटाळ बिटाळ याची ते परवा करीत नसत. ब्राम्हणांची अशी प्रकरणे बाहेर आल्यास त्यांना कोणत्याही प्रकारची शिक्षा होत नसे तर केवळ प्रायश्चित घेत असत. त्यामुळे गुन्हे करणे व प्रायश्चित घेऊन परत गुन्हा करणे हा ब्राम्हणांचा धंदाच झाला होता.दुसरा बाजीराव पेशवाने कित्येक स्त्रियांवर बलात्कार केले. तो कोणत्याही स्त्रीला जबरदस्तीने उचलून आणून शनिवारवाड्यात अत्याचार करत असे. पेशव्यांच्या या अत्याचारवरूनच तर समाजात ‘पाशवी अत्याचार,पाशवी बलात्कार'हे शब्द रूढ झाले आहेत. दुसरा बाजीरावची स्त्रियांमध्ये इतकी दहशत पसरली होती कि कित्येक स्त्रियांनी विष पिऊन आत्महत्या केल्या.महार-मांगावर कोणीही अत्याचार करावा व त्यांनी तो निपुटपणे सहन करावा अशी प्रथाच रूढ झाली होती. त्यामुळे महार-मांगाना बळी देण्याची क्रूर प्रथा सुरु झाली. इमारतीच्या पायात,किल्ला,किल्ल्याचा बुरुज,पूल,तळे व बांधकामात अस्पृश्यांचा बळी दिल्या जात असे. अशा अस्पृश्यतेच्या नावाखाली पेशव्यांनी अस्पृश्यांना दिलेली वागणूक अन्यायकारक व क्लेशदायक होती.हा अन्याय व अपमान सहन करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.या अस्पृश्य समाजाने ब्रिटीशांच्या सैन्यात भरती होण्यास सुरुवात केली कारण ब्रिटीश अधिकारी अस्पृश्य म्हणून कधीच कोणाचा भेदभाव करत नव्हते. उलट ते इथल्या जातीवादी व मनुवादी व्यवस्थेचा तिरस्कार करत होते आणि म्हणूनच अस्पृश्य समाजातील लोक ब्रिटीश सैन्यात भरती झाले. ब्रिटीश अधिकारी पेशव्यांविरुद्ध लढाई करण्यास योजना तयार करू लागले तेंव्हा ब्रिटीशांच्या महार बटालियनचा सेनापती 'शिदनाक महार' हा दुसरा बाजीराव पेशव्यास भेटण्यास गेला आणि त्याने बाजीरावास सांगितले कि, "ब्रिटीश हे परके आहेत, आम्ही त्यांच्या बाजूने न लढता आपल्या बाजूने लढू. आम्ही मायभूमीसाठी प्राणदेखील अर्पण करू,फक्त आम्हाला आपल्या राज्यात सन्मानाने आणि समानतेने जगण्याचा अधिकार द्या." परंतु पेशव्यांनी त्याची हि मागणी अमान्य केली आणि सांगितले कि, "तुम्हाअस्पृश्यांना आमच्या राज्यात सुईच्या टोकाएवढादेखील सन्मान भेटणार नाही." अशाप्रकारे खूप अपमानजनक शब्द वापरून पेशव्यांनी शिदनाक महारास हाकलून दिले. त्यामुळे शिदनाक महार याने ठरवले कि,या देशातून जुलमी पेशवाई राजवट कायमची नष्ट झाल्याशिवाय अस्पृश्य समाजाला न्याय भेटणार नाही. आणि
अखेर १ जानेवारी १८१८ रोजी तो दिवस आला आणि पेशवाईने केलेल्या अत्याचाराचा बदला घेण्याची संधी महार बटालियनला मिळाली.शिरूर छावणीपासून ब्रिटीशांच्या बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फ़्रट्रिच्या महार बटालियनचे ५०० सैनिक पुण्याच्या दिशेने पुणे काबीज करण्यासाठी निघाले. ब्रिटीशांकडून कॅप्टन *Fransis Stauntons* हा बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फ़्रट्रिच्या महार बटालियनचे नेतृत्व करत होता आणि शिदनाक महार हा या बटालियनचा सेनापती होता. ब्रिटीश पुण्याकडे निघाले आहेत हि बातमी दुसरा बाजीराव पेशवाला समजताच त्याने बापू गोखले यांच्या नेतृत्वाखाली २८००० सैन्याचा फौजफाटा शिरूरच्या दिशेने पाठवला. महार बटालियनचे सैन्य अन्न पाण्याविना, कडाक्याची थंडीत २७ मैलांच्या अथक पायी प्रवासानंतर कोरेगाव भीमा येथे पोहचले.दोन्ही सैन्याची सकाळी १० वाजता भीमा कोरेगाव येथे आमने-सामने गाठ पडली. पेशव्यांच्या २८००० सैन्यापुढे ब्रिटीश महार बटालियनचे ५०० सैनिक तुटपुंजे होते. युद्धाला तोंड फुटले आणि पेशव्यांच्या सैन्याने ब्रिटीश सैन्याला घेराव घातला. ब्रिटीशांचा एक सैनिक पेशव्यांच्या ५०-५५ सैनिकांसोबत लढत होता. आपली तहान भूक विसरून हे महार बटालियनचे सैन्य शत्रूला तोंड देऊ लागले. महार बटालियनचा प्रत्येक सैनिक हा सुडाच्या भावनेने पेटून उठला होता. त्यांना समोर फक्त आपल्यावर अत्याचार करत आलेला मनुवादी शत्रू दिसत होता, आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत अत्याचाराचा बदला घेण्याचा दृढनिश्चय त्यांनी केला होता. त्यांचे रक्त सळसळू लागले,त्यांनी त्वेषाने तलवारीच्या मुठी आवळल्या आणि शत्रूच्या देहाचे तुकडे पडायला सुरुवात झाली. रक्ताचे पाट वाहू लागले. त्यांचे शस्त्र जातीयवादी सैतानावर तुटून पडत होते. चातुर्वर्ण्य आणि मनुस्मृतीच्या विषमतावादी शत्रूचा खात्मा चालू होता. पेशव्यांच्या अफाट सैनिकांची संख्या क्षणाक्षणाला कमी होऊ लागली. पेशव्यांचे सैन्य खचू लागले. यातच बापू गोखले यांचा मुलगा देखील मारला गेला. बापू गोखले आपल्या मुलाचे शीर मांडीवर घेऊन ढसाढसा रडू लागला. हे पाहून पेशव्यांच्या सैनिकांची दाणादाण उडाली. पेशव्याचे सैन्य मागे हटू लागले व वाट मिळेल तिकडे पळू लागले.
१ जानेवारी १८१८ रोजी रात्री ९ वाजता हे युद्ध संपले आणि महार बटालियनने ब्रिटीशांना अविश्वसनीय असा अभूतपूर्व ऐतिहासिक विजय मिळवून दिला. पेशव्यांची जुलमी व अत्याचारी राजवट या देशातून कायमची नष्ट झाली. मनुस्मृतीच्या विषमतावादी व्यवस्थेचा अंत झाला आणि अस्पृश्य समाजाची हजारो वर्षापासुनच्या गुलामीतून मुक्तता झाली.या लढाईत २२ शूर महार सैनिक शहीद झाले. ब्रिटीशांनी या शूर वीरांना अभिवादन करण्यासाठी आणि नव्या पिढीला या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा मिळावी म्हणून २६ मार्च १८२१ साली भीमा कोरेगाव येथे भीमा नदी किनारी विजय स्तंभ उभारला. या विजय स्तंभावर शहीद झालेल्या २२ सैनिकांची नावे कोरलेली आहेत. अशाप्रकारे जुलमी पेशवाईचा अंत करणाऱ्या या शूरवीरांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर१ जानेवारीस नेहमी या विजय स्तंभास भेट देऊन अभिवादन करत असत. आणि तेंव्हापासून दरवर्षी देशातून लाखो अनुयायी या शूरवीरांना वंदन करण्यासाठी येत असतात.
पेशवाईचा अंत करणाऱ्या शूरवीरांना विनम्र अभिवादन..!
⚔एक महार लाखोंची हार⚔
No comments:
Post a Comment