6 डिसेंबर 56 साली
वेळ कशी ती हेरली.
दूष्ट काळाने भिमरायांची
प्राणज्योत ती चोरली.
बुद्धं सरणं गच्छामी
धम्मं सरणं गच्छामि
संघं सरणं गच्छामि
टपून बसला होता काळ
कसा महापुरुषावरती,
देशो-देशी वार्ता पसरता
हादरुन गेली ही धरती.
काळजातील हंस हरवला,
द-याला आली भरती,
सुर्य बुडाला अंधार झाला
म्हणून जनता ही झूरली.
प्रगतीचे ते युगे दिनाची
गुपीत मागे सारली.
दूष्ट काळाने भिमरायांची
प्राणज्योत ती चोरली.
बुद्धं सरणं गच्छामि
धम्मं सरणं गच्छामि
संघं सरणं गच्छामि
देश हिताच्यासाठी लिहून
गेला कायद्याची गाथा,
नमुन फक्त आयुष्यामध्ये
बुद्धं चरणी तो माथा,
हरवली आई- हरपली माई,
हरपली माता अन पिता
वाली देशाचा निघून गेला.
कोण होईल तैसा आता
वैरण रातीची मर्जी
धूरंधरावरती फीरली
दूष्ट काळाने भिमरायांची
प्राणज्योत ती चोरली.
बुद्धं सरणं गच्छामि
धम्मं सरणं गच्छामि
संघं सरणं गच्छामि
सात कोटीचा प्रकाश गेला
झाली जिवाची लाही.
भिमापाठी या जगात
आता वाली उरलेला नाही,
असे म्हणून दलित सारे
रडू लागले ढाई-ढाई
चैत्यभूमीच्या ठीकाणी अश्रु
गंगेसवे नयनी वाहू लागली,
असुन कोटी पीले तरीही
भिम मुर्ती नाकारली
दूष्ट काळाने भिमरायांची
प्राणज्योत ती चोरली.
बुद्धं सरणं गच्छामि
धम्मं सरणं गच्छामि
संघं सरणं गच्छामि
हर्ष कोपले, सुख लोपले,
बाळाचे अन आईचे
थोर उपकार देशावरती
आहे भीमाच्या त्या शाईचे
महामानवाने ते केले
कृत्याचे नवलाईचे
बुद्ध धम्माचे रोप लाऊनी
फुले उमलले जाईचे,
लढा देऊन गुलामगीरिला
अंधश्रध्दा ती मारली
दूष्ट काळाने भिमरायांची
प्राणज्योत ती चोरली.
बुद्धं सरणं गच्छामि
धम्मं सरणं गच्छामि
संघं सरणं गच्छामि
शान जळता भारतभूची
चितेवरती पाहीली.
पाहताच क्षणी कालनंदनी
श्रध्दांजली ती वाहीली
डबडबलेल्या अश्रुंनी
हीम-हीमा त्यांची गायली.
अमर झाली भिमाची किर्ती
डोळ्यांनी मी पाहीली.
जाता जाता ह्यदयी आमच्या
मुर्ती बुद्धाची ती कोरली.
दूष्ट काळाने भिमरायांची
प्राणज्योत ती चोरली.
बुद्धं सरणं गच्छामि
धम्मं सरणं गच्छामि
संघं सरणं गच्छामि..
भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांना माझे कोटि कोटि वंदन व ञिवार अभिवादन....🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
🙏🏻..मानाचा जय भीम..🙏🏻
No comments:
Post a Comment