Tuesday, 14 February 2017

Happy valentine day

पत्नीच्या केसात अचानक
गजरा घालताच
तिच्या डोळ्यात फुलणारे
प्रितीचे गुलाब
तोच माझा... *Rose day*

पत्नीला अशीच आयुष्यभर
सुख-दुःखात साथ दे
अशी याचना करतो
तोच माझा... *Prapose day*

रस्त्यावर अनाथ मुलांना
चॉकलेट देऊन हसवेन
तोच माझा... *Chocolate day*

मुलांसाठी कशाला हवा
बाहेरचा टेडी
एक दिवस घोडा होऊन
मीच होईन टेडी
तोच माझा... *Teddy day*

आई वडिलांना कधीच
आश्रम दाखवणार नाही
हे वचन देतो मी
तोच माझा... *Promise day*

संध्याकाळी थकुन आल्यावर
मुले गोड मीठी मारतात
तोच माझा... *Hug day*

रात्री सर्वाच्या नकळत पत्नीचा
माझ्या उडत्या चुंबनाला होकार
तोच माझा... *Kiss day*

सुट्टीच्या दिवशी
कुटुंबासोबत हसत खेळत
घालवतो आम्ही दिवस
तोच माझा... *all family Valentine day*

No comments:

Post a Comment