अंडे आणि वीट. कोंबडीचे अंडे आणि घराच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी वीट यांच्यात एका बाबतीत साम्य आहे. ते कोणत्या बाबतीत आहे? ......जरा ओळखुन दाखव! मि मित्राने माझ्यापुढे कोडे टाकले.
मला विचारचक्रात अडकवून तो पसारा झाला.
मी विचार करु लागलो,यात काय बरे साम्य असणार ?
खूप विचार करूनही ऊत्तर न सापडल्यामुळे शेवटी शेजारी सुरू असलेल्या बांधकामावरुन दोन वीटा व बाजारातून अर्धा डझन अंडी घेऊन घरी आलो.खूप निरीक्षण केले;पण ऊत्तर सापडले नाही.
दुस-या दिवशी तोच मित्र पुन्हा माझ्याकडे आला.काय सापडले का ऊत्तर? मी नकारार्थी मान हलवली आणि आता तूच काय ते साम्य दाखव, असे म्हणून ती अंडी आणि वीट त्याच्या-पुढे ठेवल्या. मित्राने हातात अंडे घेतले, ते ऊभे ठेवले आणि दाबले, पण ते फुटले नाही. मग त्याने अंडे आडवे केले आणि दाबले, ते चटकन फुटले. मग त्याने दोन फुटांवरुन हातात ऊभी धरलेली वीट खाली सोडली,विटेला काहीच झाले नाही. नंतर तेवढ्याच अंतरावरुन त्याने वीट आडवीधरुन खाली सोडली. आता मात्र वीट फुटली. मित्र माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, "वीट आणि अंडे, ऊभे असताना फुटत नाही, मात्र आडवे होताच फुटते हे त्या दोन्हीत साम्य.
माणूस त्या वीट किंवा अंड्यासारखाच......
तो जोपर्यंत खंबीरपणे उभा आहे, सजग आहे तोपर्यंत कोणीच त्याचे भवितव्य बिघडवू शकत नाही. पण जर का तो सुस्तावला,जरा आडवा झाला, की त्याचे भवितव्य फुटण्याची शक्यता बळावते, म्हणून खंबीरपणे ऊभे राहा.जग तुमचे काहीच बिघडवू शकत नाही.
Friday, 27 January 2017
खंबीरपणे उभे रहा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment