"काम लवकर करावयाचे असेल, तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*
"दैवावर भरवसा ठेवून वागू नका, जे काम करावयाचे असेल ते आपल्या मनगटाच्या जोरावर करा..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*
"माणसाने खावे जगण्या साठी,
पण जगावे समाजासाठी...."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*
"दुसर्याच्या सुख -दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*
"विचारक्रांती झाल्याशिवाय आचारात फेरबदल होवू शकत नाही.
आचारात फेरबदल करावयाचा झाल्यास आधी मनावर बसलेल्या जुन्या विचारांची छाप काढून टाकणे अगदी अगत्याचे आहे...."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*
"सेवा जवळून, आदर दुरून, व् ज्ञान आतून असावे..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*
"तुम्ही आपली गुलामगिरी नष्ट करा.
स्वाभिमान शुन्यतेचे जीवन जगणे नामर्दपणाचे आहे."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*
"जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही,
दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्याईतकी बुद्धी ठेवतात,
स्वाभिमान ज्याला आहे,
तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*
No comments:
Post a Comment