Wednesday, 16 November 2016

आरोग्य विमा 

आजच्या धावत्या जगात गतिशील राहताना एक अनोळखी भिती सतत मानवाच्या मनात घर करुन असते. कुठल्यातरी गोष्टीची धास्ती असते. मानवाचे आयुष्य दुबळे होत चालले आहे. अशा परिस्थितीतच मानव स्वतःचा बचाव करण्याचा, परिस्थितीतून मार्ग काढण्याचा सतत प्रयत्न करत असतो. पण काही वेळा तो ती परिस्थिती आवाक्यात आणण्यास असमर्थ ठरतो. याच भितीमुळे व धास्तीमुळे विमा कंपन्यांना आज जगातील सर्वात मोठी व यशस्वी उद्योजकांपैकी एक मानले जाते.
विमा एक असा प्रयत्न असतो की ज्याद्वारे प्रतिकुल परिस्थितीचे पूर्वानुमान लावले जाते व त्यावर मात करण्यासाठी आधीच उपाययोजना करण्या संबंधी तडजोड केली जाते. जगभरात विम्याचे विविध प्रकार आढळतात. ते जगातील प्रत्येकासाठी उपलब्धही असतात. भारतात विशेषतः विम्याचे दोन विभागात वर्गीकरण होते. जसे साधारण विमा आणि आयुर्वीमा.
आयुर्वीमा म्हणजे काय?
आपल्या आयुष्यात भविष्यात घडण्या-या प्रतिकुल घटना किंवा संकटे थांबवणे आपल्या नियंत्रणात कधीच नसते. अशा घटना किंवा येणा-या परिस्थितीचा अनुमान बांधून आपण आपल्या आयुष्याचे महत्व जाणून विमा करून घेतल्याने निधनानंतर विम्याची रक्कम विमा कंपनीद्वारे नोंद केलेल्या वारसदाराला मिळते. हे वारसदार पत्नी, मुले, पालक यांसारखे कोणीही असू शकते.
साधारण विमा म्हणजे काय ?
साधारण विम्यामध्ये आयुर्वीमाप्रमाणे परतफेड होत नाही पण त्याद्वारे आपत्तीपासून किंवा अशा गरजेच्या क्षणी आपले संरक्षण करता येत असते. साधारण विमा विविध परिस्थितीत उपयुक्त ठरू शकते जसे आजारीपण, अपघात, नैसर्गीक आपत्ती,चोरी इत्यादी. विम्याच्या या प्रकारात अनेक उपशाखा असतात. जसे प्रवासी विमा, घराचा विमा, दुकानदारी विमा, वैयक्तिक अपघात विमा इत्यादी. आरोग्य विमाद्वारे आपणास अपघातासारख्या प्रसंगांसाठी वैद्यकीय चिकित्सेसाठी लागणा-या खर्चासाठी आर्थिक पाठिंबा मिळतो. आजच्या धावत्या जगासाठी हे अत्यंत महत्वपूर्ण आर्थिक उत्पादन आहे. याच्या मदतीने आपणास प्रसंगी हवे असलेले योग्य उपचार आर्थिक दृष्टिकोनाने काळजी न करता घेता येतात.
आरोग्य वीम्याचे कार्य कश्याप्रकारे चालते?
आरोग्य वीम्याचे तंत्र व प्रक्रिया अगदी सोप्या असतात. आपण या विमा नितीनुसार आपण भरलेली रक्कम ही आपल्यास आजारात किंवा अपघातात वैद्यकीय किंवा औषधांचा खर्च परत मिळवण्यासाठी भरत असतो. तसेच ह्या नितीतंत्रात रुग्णालयात दाखल करण्यापासून, डॉक्टरांची आकारणी, औषधे व इतर सेवा खर्चाचा समावेश असतो. सहसा आरोग्य विमा नितीमध्ये रोजच्या म्हणजेच नित्यनेमाची औषधे किंवा नित्यनेमाचे वैद्यकीय उपचार यासाठी लागू होत नाही.
आपण आपल्या स्वतःसाठी किंवा आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्य विमा निती विकत घेऊ शकतो. आरोग्य विमा खरेदी करण्यासाठी आपणास त्याचा वार्षिक हप्ता किंवा आकारणी विमा कंपनीला भरावी लागते. आपण आपल्या विम्याची रक्कम ठरवू शकतो व वार्षिक आकारणी भरु शकतो.  जर आपण आजारी पडलो तर विमा कंपनीचे हे कर्तव्यच असते की आपल्या विम्याची रक्कम परतफेड केली जावी. ही परतफेड एक रक्कमी किंवा आपल्या गरजेनुसार वेगवेगळ्या हप्त्यात असू शकते. उदाहरणार्थ, जर आपल्याकडे एक लाख रुपयांची विमानिती असेल, आपण आजारी पडलेलो असलो तर आपणास विमा कंपनीकडून एक लाखापर्यंत परतफेड मिळू शकते. जर आपण अशा वेळेस कमी आवश्यकता असेल तर विमा कंपनी आपणास गरजेनुसार हप्त्यात रक्कम देते.    ही देयक रक्कम आपणास विमा कंपनीकडून दोन मार्गाने मिळू शकते. ते पुन्हा आपल्या विमानितीच्या प्रकारावर अवलंबून असते. आपण आजारी पडल्यानंतर किंवा दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर आपण रुग्णालयास देयक भरल्यानंतर विमा कंपनीकडे उपचारानंतर परतफेडीसाठी दावा करु शकतो. दुस-या प्रकारात आपल्या समस्यांच्या प्रसंगी विमा कंपनीच्या नितीनियमांनुसार उपचारासाठी ठरलेल्या रुग्णालयात दाखल केल्यास रुग्णाची बिले म्हणजेच देयक रक्कम विमा कंपनी व रुग्णालय यांच्यातच थेट व्यवहारीत राहते.
आपल्या आयुष्यात कोणताही अडथळा न येता आपले आयुष्य सुरळीत राहो हा सकारात्मक दृष्टिकोन असतो पण दुरदृष्टी ठेऊन केलेल्या या नियोजनामुळे आपण भविष्यातील नकारात्मक शक्यतांना वर काही प्रमाणात मात करु शकतो. म्हणूनच आपला व आपल्या कुटुंबियांचा विमा करुनच घ्यावा.

No comments:

Post a Comment