Thursday, 24 November 2016

महत्व जीवन विमाचे

एकदा मी माझी कार सर्व्हीसींग करायला गेलो होतो. तेथे मला माझा मित्र भेटला. तो सरकारी अधिकारी आहे. त्याची कारही त्यांने सर्व्हीसींग साठी आणलेली होती.

मी त्याला म्हणालो की मी अॉफीस मध्ये एकदा त्याला भेटायला येणार आहे.

तो म्हणाला, " एक मित्र म्हणून येणार असशील तर जरूर ये. पण विम्याविषयी बोलणार असशील तर तुझा वेळ वाया घालवू नकोस."

मी थोडा त्याचा जवळ गेलो आणि हळूच त्याच्या कानात कुजबुजलो, "तुला फातिमाशी लग्न करायला आवडेल का?"

"कोण ही फातिमा???"

मी म्हणालो, "तुला काय करायचंय? कोण फातिमा?? अरे तू मॅरीड आहेस. ती एक लेडीज आहे.
काय करायचंय तुला ती कोण हे नक्की जाणून?
बरं ते सोड....
जर तू लग्नाला तयार असशील तर ती कदाचित एखादी म्हातारी असेल, नाही म्हणाला तर 'मिस इंडिया' असेल."

तू "हो" म्हणाला किंवा "नाही"..... तुला खंत लागून राहिलंच. पश्चात्ताप तर होईलच."

"जेव्हा तू मला म्हणाला की विम्याविषयी बोलणार असशील तर तुला आजीबात इंटरेस्ट नाही, तर तू खरोखरच एक प्रामाणिक व्यक्ती  आहेस. एखादी व्यक्ती तू पाहीलीच नाही तर तुला इंटरेस्ट कशाला असेल? एखाद्या गोष्टीविषयी तुला पुर्ण माहितीच नाही तर तुला इंटरेस्ट तरी कशाला असेल?

तुला माहितीच नाही की जीवन विमा काय चिज आहे? त्याचा तुला काय फायदा होईल याचे विषयी तू अद्न्यानी आहेस.

"मित्रा, तुझ्या अनमोल वेळेतून मला फक्त काही मिनिटे हवे आहेत. तुला व तुझ्या प्रिय कुटूंंबाला विम्याचे अतोनात महत्व अजून व्यवस्थित माहितीच नाही."

त्याने माझ्या विनंती ला मान दिला. मी त्याला सांगितले की विमा म्हणजे त्याच्या कुटूंबाचे अन्न, वस्त्र, निवारा आहे (जेव्हा तो या जगात नसेल).
विमा म्हणजे त्याच्या औषधी पाण्याचा खर्च आहे. पेन्शन आहे. त्याच्या मुलाबाळांचे शिक्षण, लग्न... नव्हे...नव्हे..त्यांचे संपूर्ण भवितव्य आहे.

त्याने आता एक मोठा विमा घेतलेला आहे.                                                -संकलन: संजय देवरे (रिदाल नायडू यांच्या पुस्तकातून स्वैर अनुवाद)

No comments:

Post a Comment