Thursday, 24 November 2016

हसा

आजकाल टिव्ही वर एवढे देवांचे प्रोग्रॅम लागत आहेत की रात्री झोपताना टीव्हीकडे पाय करून झोपायला पण भीती वाटते, पाप लागेल की काय?
😀😀😀
जेव्हापासून बुलेट मध्ये Self Starter आले आहे तेव्हापासून एका झापडीत खाली पडणारे लोक सुद्धा बुलेट घेऊन फिरायला लागले आहेत

😀😀😀
हरवलेलं प्रेम एक वेळा परत मिळेल पण गाडी पुसायचा फडका कधीच परत मिळणार नाही. फडकी चोर साले
😀😀😀

मोबाईल वापराचा आता इतका अतिरेक झालाय, पर्वा शेजारी बसलेला एक जण पेपरमधील चित्र बघता बघता अचानक २ बोटांनी झूम करायचा प्रयत्न करायला लागला होता
😀😀😀
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका…. जी व्यक्ती तुम्हाला वेळेवर तंबाखू देते
😀😀😀

मिटिंग मध्ये बॉसच्या जोकवर तोच जोरात हसतो ज्याचा EMI सर्वात जास्त असतो
😀😀😀
आमच्याकडे एक इंजिनियर आहे त्याच्या कामात चूक काढली की त्याचे नेहमीचे वाक्य, “साहेब लय बारीक बघितलं की बाईला पण मिशा दिसत्यात”
😀😀😀

बायका फार नशीबवान असतात कारण
त्यांना बायका नसतात
😀😀😀

हे एक गोष्ट खरी आहे हा… जगात सर्व माणसांची वेगवेगळी नवे आहेत पण गर्दीत जेव्हा आपण एखाद्याला आवाज देतो, “ए माकडा” तेव्हा १५ पैकी १२ जण तरी मागे वळून पाहणारच
😀😀😞

अॅक्टीवाच्या सायलेंसरवर बायकोचं नाव लिहिलं तर “बुलेट” चा आवाज येतो म्हणे….
😀😀😀
बाबा : आजपर्यंत तु असं काही काम केलंस का ज्याने माझी मान वर होईल?
मुलगा : एकदा तुमच्या डोक्याखाली उशी लावली होती, विसरले का लगेच?
😀😀😀
लहान असताना झोपेत हसलो की आई म्हणायची सटवाई खेळवते आणि आता हसलो तर बायको म्हणते कोणती सटवी खेळवते
😀😀😀

I-Phone 7 हा लगातार सातवा असा फोन आहे जो आपल्याकडं नाही

😀😀😀
तुमचा बेस्ट फ्रेंड जर चुकिच्या मुलीच्या प्रेमात पडला असेल तर त्याला अडवू नका
कारण अक्कल बदाम खाल्ल्याने नाही धोका खाल्याने येते
😀😀😀

त्या मुली पण काही आतंकवाद्यांपेक्षा कमी नव्हत्या. ज्या सर वर्गात येताच आठवण करुन द्यायच्या
– सर आज तुम्ही गृहपाठ चेक करणार होता ना?
😀😀😀
“बघून घेईन” म्हणत आयुष्य वाया घालवण्यापेक्षा “घेऊन बघतो” म्हणा आणि आयुष्य सार्थकी लावा
😀😀😀😀

आजची महत्वाची बातमी : भारी पावसानं पुण्यामध्ये जबरदस्त नुकसान
10-12 जणांची गायछाप भिजली
😀😀😀
काय दिवस आलेत… चौथी पाचवीची पोरं प्रेमाच्या गप्पा मारतायंत..
आणि तरुण पोर pokemon पकडत फिरतायंत
😀😀😀
समस्त स्त्री जातीला पडलेला एक गहन प्रश्न – पुरुष तर कधीच उपवास करत नाहीत तरीही त्यांना आपल्या सारख्या चांगल्या बायका कशा मिळतात??
😀😀😀
सर्वच आईवडिलांचा सर्वात सुंदर डायलॉग – डोकं तर खूप आहे त्याला पण तो अभ्यासच करत नाही
😀😀😀
काही लोक नाकात बोट घालून बोट असे पाहतात की जसे नाकातून हिरा निघाला
😀😀😀
लग्नाच्या वरातीत कितीही नाचणारे तीस मर खान येउद्यात
हवा फक्त त्याचीच होते जो झोपून नागीण डान्स करतो.
😀😀😀
भारत सरकारचा नवीन नियम
ज्यांचा मोबाईल कँमेरा २ मेगा पिक्सेल आहे अशांना दारिद्र रेषेखालील घोषित करण्यात येईल
😀😀😀
एक माणूस मच्छिवालीला : ए मावशी या सुरमई मध्ये गाबोळी (अंडी) आहेत का?
मच्छिवाली : ए बाबा, मच्छि वजन करून देतात, सोनोग्राफी करून नाही
😀😀😀
आयुष्यात कधी पाय डगमगला, कधी पडलो पण हिम्मत नाही हरलो
पुन्हा उभा राहिलो आणि आवाज दिला, “वेटर, अजून एक खंबा आन”
😀😀😀
तुम्हाला माहित आहे काय पॉपकॉर्न कढईत ठेवल्यावर उड्या का मारतात?
स्वतः गरम कढईत बसून पहा, मग आपोआप समजेल
😀😀😀

व्यायाम करणे, ड्रिंक्स न घेणे व शाकाहारी राहणे ह्याने तुमच्या आयुष्यात काही वर्ष नक्की वाढतील
पण लक्षात ठेवा की ही वर्षे तुमच्या म्हातारपणातली वाढणार आहेत, तरुणपणातली नव्हे
😀😀😀
बासुंदीचा फुल फॉर्म सापडला : बाई सुंदर दिसते
😀😀😀

ATM मधून २०० रुपये निघताना इतका आवाज होतो की असं वाटतं की चुकून ४-५ हजार निघतात की काय…

😀😀😀

चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो देवमाणूस आणि जो कधी चुकतच नाही तो बायकोच्या माहेरचा माणूस
😀😀😀

No comments:

Post a Comment